आत्मा चंद्रपूर मध्ये आपले स्वागत आहे

शेतकयांना कृषि विस्ताराची माहिती पोहचविणे याकरिता जिल्हास्तरावर आत्मा या स्वायंत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सन 2005 मध्ये धर्मदाय आयुक्त यांचेकडे आत्मा, चंद्रपुर संस्थेची (अधिनियम 1860) अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.

कृषि संशोधक, विस्तार कार्यकर्ते, शेतकरी व इतर भागधारक (अशासकीय संस्था, सार्वजनीक, सामुदायीक व खाजगी क्षेत्र इत्यादी) यांची संयुक्त सांगड घालून त्यांचा अभ्यास करुन जिल्हा विस्तार आराखडा व स्थानीक गरजा व परिस्थितीशी निगळीत तंत्रज्ञान प्रसारणातील नाविण्यापुर्णतेशी परिचीत करणे (सुरुवात करणे) या करिता शिफारशी करुन या सर्वाना एकत्र ठेवण्याची जबाबदारी आत्माची आहे. दुस-या शब्दात सांगायचे झाले तर, हा प्रकल्प जिल्हात कृषि विकासाला गती देण्याकरिता मागणीनुरुप, निश्चीत परिस्थित, विविध विषयाशी संबंधीत संशोधन विस्तार आराखडा विकसीत करण्यासाठी आत्मा संस्था ही अनिवार्य आहे. यथार्थदर्शी संशोधन विस्तार आराखडा करण्यासोबतच आवश्यक विकासात्मक कार्य कोणामार्फत करावे. याबाबत सुध्दा SREP मध्ये पायाभुत माहिती देण्यात आलेली आहे.

Read More

गूगल प्ले स्टोअर वरून चांदाकृषी अँप डाउनलोड करा