आमच्या विषयी

आत्मा बद्दल

showcase image

जिल्हा स्तर नियोजन व अंमलबजावणी :-

आत्मा ही एक स्वायत्त संस्था आहे. आत्मा नियामक मंडळ सर्वसमावेश दिशादर्शक धोरण ठरवेल नियामक मंडळ, प्रकल्प संचालक आत्मा, प्रकल्प उपसंचालक, आत्मा व सहाय्यक कर्मचारी यांचे सहकार्याने कामकाज करतील. आत्मा व्यवस्थापन समिती (AMC) ही योजना अंमलबजावणीसाठी कार्यकारी शाखा असेल. जिल्हा स्तरावरील जिल्हा शेतकरी सल्ला समिती ही जिल्हा कृषि विस्तार नियोजन व अंमलबजावणी मदत करेल यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा (SREP) तयार करण्याबरोबरच जिल्हयातील संपूर्ण कृषि विस्तार व्यवस्थापन व नियोजन समर्पित कर्मचार्याच्या मदतीने संस्था कार्य करेल.


तालुकास्तर नियोजन व अंमलबजावणी :-

तालुकास्तरावर – तालुका/गट तंत्रज्ञान चमू (BTT) ज्यामध्ये कृषि व कृषि संलग्न विभागातील गट/तालुका स्तरावरील अधिकारी असतील गट शेतकरी सल्ला समिती (BFAC) ज्यामध्ये प्रगतीशील व अनुकरणीय शेतकरी असतील, त्यांचे तालुका पातळीवरील कृषि विस्तार नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असेल. गट शेतकरी सल्ला समितीत निवडलेले शेतकरी हे प्रामुख्याने शेतकरी/कृषि विज्ञान मंडळ, शेतकरी समुह यांचेतुन चक्राकार (रोटेशन) पध्दतीने निवडण्यात यावेत जे तालुका तंत्रज्ञान चमुस वेळोवेळी मार्गदर्शन करतील. तालुका आत्मा कक्षामध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक हे BTT व BFAC च्या मदतीने तालुका कृति आराखडा तयार करणे व अंमलबजावणी संदर्भात जबाबदारी पार पाडतील.


गावस्तर नियोजन व अंमलबजावणी :-

i) शेतकरी मित्र हा कृषि विस्तार यंत्रणा व शेतकरी यांचेतील महत्वाचा दुवा असेल. प्रत्येकी दोन गावांसाठी 1 शेतकरी मित्र निवडला जाईल. शेतक­यांना कृषि संलग्न विभागाबाबत मार्गदर्शन करणेसाठी शेतकरी मित्र उपलब्ध असेल. शेतकरी, शेतकरी सेवा केंद्र इ. विस्तार कार्यक्रमांबाबत माहितीची देवाण-घेवाण करणे संदर्भात शेतकरी मित्राची मदत होईल. (ii) ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे कृषि व्यावसायिकांना तांत्रिक सहाय्य देऊन कृषि विस्तारामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे. (iii) तालुक्यात कृषि व कृषि संलग्न विषयाच्या शेतीशाळा घेण्यात याव्यात.